अ‍ॅपशहर

कोची टस्कर्सचा विजय; BCCI देणार ८५० कोटी

आयपीएलमधून निलंबित केलेल्या कोची टस्कर्सने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला खटला जिंकला आहे. त्यामुळे बीसीसीआयला नुकसान भरपाई म्हणून ८५० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

Maharashtra Times 24 Oct 2017, 4:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kochi tuskers win arbitration vs bcci asks rs 850 crores in compensation over termination
कोची टस्कर्सचा विजय; BCCI देणार ८५० कोटी


आयपीएलमधून निलंबित केलेल्या कोची टस्कर्सने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला खटला जिंकला आहे. त्यामुळे बीसीसीआयला नुकसान भरपाई म्हणून ८५० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

२०११ मधील आयपीएलच्या चौथ्या पर्वात करारानुसार वार्षिक १५६ कोटी रुपये अदा करण्याबाबत बँक हमी न दिल्याने बीसीसीआयने कोची टस्कर्सवर निलंबनाची कारवाई केली होती. बीसीसीआयच्या कारवाईविरोधात फ्रेंचाईजीने २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकसानीपोटी बीसीसीआयने ८५० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने कोचीच्या बाजूने निकाल दिला आहे. आता बीसीसीआयला ही रक्कम कोची टस्कर्सला द्यावी लागणार आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

कोचीला नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. सर्व कायदेशीर पर्यायांवर चर्चा झाली आहे. लवादाचा निकाल विरोधात लागल्यानंतर त्याला शिखर न्यायालयात आव्हान देणे उचित नाही, असे आयपीएल प्रशासकीय परिषदेच्या एका सदस्याने सांगितले. कोचीचा करार रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी घेतला होता. एका व्यक्तीच्या हट्टाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यांनी हा निर्णय घेतला नसता तर त्यावेळी आम्ही पर्यायी मार्ग काढला असता, असेही या सदस्याने सांगितले. कोचीने नुकसान भरपाईपोटी ८५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. याबाबत प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली आहे. हा मुद्दा सर्वसाधारण सभेसमोर उपस्थित करण्यात येईल. या प्रकरणावर जाहीरपणे बोलणे उचित ठरणार नाही, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज