अ‍ॅपशहर

कोहलीला खुणावतेय अव्वल रँकिंग

भारतीय वनडे व टी-२० संघाचा नवा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल होण्याची संधी आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा अब्राहम डिव्हिलियर्स अव्वल क्रमांकावर असून कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडेत चमक दाखवल्यास तो डिव्हिलियर्सला मागे टाकू शकतो. डिव्हिलियर्स आणि कोहली यांच्यात सध्या १३ गुणांचे अंतर आहे.

Maharashtra Times 12 Jan 2017, 4:00 am
दुबईः भारतीय वनडे व टी-२० संघाचा नवा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल होण्याची संधी आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा अब्राहम डिव्हिलियर्स अव्वल क्रमांकावर असून कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडेत चमक दाखवल्यास तो डिव्हिलियर्सला मागे टाकू शकतो. डिव्हिलियर्स आणि कोहली यांच्यात सध्या १३ गुणांचे अंतर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kohli eyes top spot in icc rankings
कोहलीला खुणावतेय अव्वल रँकिंग


दरम्यान वनडे मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यास भारतीय संघालाही वनडे रँकिंगमध्ये फायदा होऊ शकतो. टीम इंडियाचे गुण ११४ होऊ शकतात. मात्र निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला तर इंग्लंडला एका क्रमांकाचा फायदा होईल. यामुळे भारतीय संघ मात्र पाचव्या क्रमांकावर घसरू शकतो.

फलंदाजांच्या रँकिंगमध्ये डिव्हिलियर्स व कोहली यांच्या मागोमाग आहे तो ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर. त्याने सिडनी कसोटीत पाकिस्तानच्या माऱ्याची पिसेच काढून टाकली होती. त्याच्या व कोहलीमध्ये अवघ्या दोन गुणांचे अंतर आहे. इंग्लंडचा जो रूट सातवा असून पाकिस्तानकडून सर्वोत्तम रँकिंग आहे ते बाबर आझमला. तो वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये १५वा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज