अ‍ॅपशहर

भारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट

टी-२० विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने उभे ठाकत असल्याने करोडो क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उस्तुकता लागली असताना या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कोलकात्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून सायंकाळीही तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Times 19 Mar 2016, 11:03 am
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम light showers in kolkata ahead of india pakistan clash in t20wc today evening
भारत-पाक सामन्यावर पावसाचे सावट

टी-२० विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने उभे ठाकत असल्याने करोडो क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उस्तुकता लागली असताना या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कोलकात्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून सायंकाळीही तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोलकात्यातील इडन गार्डन्सवर आज रात्री ७.३० वाजल्यापासून भारत-पाक महामुकाबला रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकातील हा सर्वात 'सुपरहिट' सामना ठरणार आहे. भारतातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमतेचं हे मैदान सायंकाळी प्रेक्षकांनी खच्चून भरणार आहे. 'सुपर टेन'मधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा झटका बसलेल्या भारतीय संघासाठी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठीही आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. असे असताना पावसाच्या हलक्या सरींनी भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय चाहत्यांचाही काळजाचा ठोका चुकला आहे.

कोलकात्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दहाच्या सुमारास शहराती विविध भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सायंकाळीहीही हवामान काहीसं असंच राहिल. पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

दरम्यान, तुरळक पाऊस पडल्यास फार मोठा अडथळा येईल असे वाटत नाही. सामना सुरळीतपणे पार पडेल, असे मैदान व्यवस्थापनातील सूत्रांकडून सांगण्यात आलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज