अ‍ॅपशहर

तीन महाराष्ट्रकन्यांना प्रत्येकी ५० लाख

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मैदान गाजवणाऱ्या महाराष्ट्रकन्या पूनम राऊत, स्मृती मंधाना आणि मोना मेश्राम यांना प्रत्येकी ५० लाखांचं इनाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं आहे. वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाने जी दमदार कामगिरी केली आहे त्याने देशाची मान जगभरात उंचावली आहे. याबद्दल सभागृहातर्फे मी महिला संघाचं अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Maharashtra Times 28 Jul 2017, 9:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra cm devendra fadnavis congratulates indian women cricket team in assembly
तीन महाराष्ट्रकन्यांना प्रत्येकी ५० लाख


महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मैदान गाजवणाऱ्या महाराष्ट्रकन्या पूनम राऊत, स्मृती मंधाना आणि मोना मेश्राम यांना प्रत्येकी ५० लाखांचं इनाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं आहे.

भारतीय महिला संघाला वर्ल्डकपने थोडक्यात हुलकावणी दिली. इंग्लंडविरुद्ध झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भारताला निकराची झुंज देऊनही पराभव सहन करावा लागला. या पराभवाने चाहत्यांचा हिरमोड झाला असला तरी महिला संघ ज्या जिद्दीने खेळला त्याचं सगळेच कौतुक करत आहेत. इंग्लडने वर्ल्डकप जिंकला असला तरी भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वाची मने जिंकली आहेत. याच कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी भारतीय संघातील तीन महाराष्ट्रकन्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ५० लाखांचं इनाम जाहीर केलं.


Maharashtra CM @Dev_Fadnavis congratulates #IndianWomenCricketTeam in Assembly & announces of ₹50 lakh each for 3 players from Maharashtra! pic.twitter.com/1vgLlEfZmU — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 28, 2017
वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाने जी दमदार कामगिरी केली आहे त्याने देशाची मान जगभरात उंचावली आहे. याबद्दल सभागृहातर्फे मी महिला संघाचं अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज