अ‍ॅपशहर

महाराष्ट्र मजबूत स्थितीत

केदार जाधवपाठोपाठ चिराग खुराणाने झळकविलेल्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आसामविरुद्धच्या लढतीत ५४२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर अनुपम संकलेचाच्या भेदक माऱ्यासमोर आसामची दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १३२ अशी स्थिती झाली होती.

Maharashtra Times 23 Nov 2016, 4:00 am
वृत्तसंस्था, चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra ranji team
महाराष्ट्र मजबूत स्थितीत

केदार जाधवपाठोपाठ चिराग खुराणाने झळकविलेल्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आसामविरुद्धच्या लढतीत ५४२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर अनुपम संकलेचाच्या भेदक माऱ्यासमोर आसामची दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १३२ अशी स्थिती झाली होती.

महाराष्ट्राने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ५ बाद ३५२ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघ किती धावांची भर घालणार, याबाबत औत्सुक्य होते. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चिराग १४, तर विशांत मोरे ९ धावांवर खेळत होता. या दोघांनी १०५व्या षटकात महाराष्ट्राला चारशेचा टप्पा गाठून दिला. चिराग-विशांत यांनी पाचव्या विकेटसाठी २२६ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी केली. महाराष्ट्राचा डाव ५४२ धावांवर संपुष्टात आला. चिरागने १८४ चेंडूंत दहा चौकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली.

स्कोअरबोर्ड : महाराष्ट्र पहिला डाव १४४ षटकांत सर्वबाद ५४२ (केदार जाधव ११५, चिराग खुराणा नाबाद ११२, नौशाद शेख ९७, स्वप्नील गुगळे ५०, विशांत मोरे ४८, जमालुद्दीन ३-९१, अबु नचिम ३-८३) वि. आसाम पहिला डाव – ३५ षटकांत ३ बाद १३२ (रिशव दास खेळत आहे ५३, अनुपम संकलेचा ३-४५).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज