अ‍ॅपशहर

वॉर्नरच्या शब्दाने मोहम्मदला बळ

हैदराबादने दिल्लीविरुद्धची मागील आयपीएल झुंज जिंकली. त्या सकाळी पार पडलेला हा प्रसंग... मोहम्मद सिराज याला हैदराबाद संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेः ‘आज तू अंतिम अकरा जणांमध्ये निवडला गेला आहेस. खेळण्यासाठी तयार राहा’. सिराज सुखावला; पण आनंदासह आले ते दडपण... अन् जोडीला भीतीदेखील. उत्सुकतेने पोटात गोळा आला तो वेगळाच.

Maharashtra Times 22 Apr 2017, 1:12 am
वृत्तसंस्था, हैदराबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mohammed siraj backed by warner
वॉर्नरच्या शब्दाने मोहम्मदला बळ

हैदराबादने दिल्लीविरुद्धची मागील आयपीएल झुंज जिंकली. त्या सकाळी पार पडलेला हा प्रसंग... मोहम्मद सिराज याला हैदराबाद संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेः ‘आज तू अंतिम अकरा जणांमध्ये निवडला गेला आहेस. खेळण्यासाठी तयार राहा’. सिराज सुखावला; पण आनंदासह आले ते दडपण... अन् जोडीला भीतीदेखील. उत्सुकतेने पोटात गोळा आला तो वेगळाच. ते सहाजिकच होते; कारण आतापर्यंत युवराजसिंग, डेव्हिड वॉर्नर, नेहरा, भुवनेश्वरकुमार यांना फक्त टीव्हीवर झुंजताना बघितले होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रतिस्पर्ध्याशी भिडण्याची संधी सिराजला मिळाली होती. त्यामुळे उत्सुकता, भीती अशा भावना त्याच्या मनात दाटून आल्या होत्या. २३ वर्षांच्या या तेज गोलंदाजाला हैदराबादने आयपीएल लिलावातून २.६ कोटी एवढी बोली लावून आपल्या तंबूत समाविष्ट करून घेतले. २०१६-१७च्या २१ स्थानिक सामन्यांत त्याने ६२ विकेट्स टिपल्या. त्याचेच हे फलित होते. अन् दिल्लीविरुद्ध त्याला अंतिम चमूमध्येदेखील संधी मिळाली. त्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद सिराजची सुरुवात मात्र अडखळती झाली. दिल्लीच्या सॅम बिलिंग्जने त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता, तर पुढील चेंडूंवरही बऱ्यापैकी धावा झाल्या. निराश झाल्याने मोहम्मद सिराजने खांदे पाडले, तो निराश झाला; पण मिडऑफला उभा असलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरने बाजू सावरली. त्याने वेळीच मोहम्मदला पाठिंबा देत, आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. मोहम्मदही पुन्हा सज्ज झाला अन् बिलिंग्जला त्याने मिडविकेटवरील दीपक हुडाकरवी झेलबाद केले. त्याच्या पहिल्या षटकांतील आकडेवारी होती एका षटकांत १३ धावांत एक विकेट, तर त्याने पुढे कामगिरी उंचावण्यावर भर देत एकूण चार षटकांत ३९ धावांत दोन फलंदाज टिपले. ‘बिलिंग्जने मला पहिल्या काही चेंडूंवर दिलेल्या ‘प्रसादामुळे’ गोलंदाजीसाठी रनअप घेताना पाय जड झाले होते. हा दडपणाचा परिणाम होता. मात्र या दडपणाचा मुकाबला करत जो सकारात्मक निकाल मिळवून देतो, तो तरतो. आयपीएल ही अशाच खेळाडूंसाठी आहे’, असे मोहम्मद म्हणाला.दिल्लीविरुद्धच्या त्या लढतीत मोहम्मदने नव्या चेंडूची धुरा वाहिली ती भुवनेश्वकुमारसह. भुवीने आपल्या पहिल्याच षटकांत अवघ्या दोन धावा दिल्या होत्या. ‘हैदराबाद संघाची भट्टी मस्त जमून आली आहे. आशीष नेहरा भाई, भुवी भाई यांच्याकडून गोलंदाजीचे बरेच बारकावे शिकता येत आहेत. भुवी भाईंनी मला खूप मदत केली. वेगवेगळ्या फलंदाजांना अभ्यासून त्यानुसार गोलंदाजी करण्याबाबत भूवीने समजावले. भुवीच्या या मदतीबद्दल मी खूप आभारी आहे’, असे मोहम्मद नमूद करतो. हैदराबादी मोहम्मदने बिलिंग्जचाच नव्हे, तर त्यानंतर कर्दनकाळ ठरू पाहणाऱ्या संजू सॅमसनचाही अडसर दूर केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज