अ‍ॅपशहर

धोनीच्या प्रशिक्षणाला लष्करप्रमुखांची परवानगी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतलेल्या धोनीने लष्करी सेवा बजावण्याची इच्छा व्यक्त केली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2019, 8:26 am
नवी दिल्लीः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhoni


भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतलेल्या धोनीने लष्करी सेवा बजावण्याची इच्छा व्यक्त केली होती.

लष्करप्रमुखांनी दिलेल्या परवानगीनंतर धोनी आता आगामी काही दिवस लष्कराच्या 'पॅराशूट रेजिमेंट बटालियन'सोबत प्रशिक्षण घेणार आहे. या विशेष प्रशिक्षणासाठी धोनी जम्मू काश्मीरला जाणार असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. धोनीला केवळ प्रशिक्षणाची परवानगी देण्यात आली असून, सक्रीय मोहीमेत त्याला सहभागी होता येणार नाही, असे लष्करातील बड्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले.


दरम्यान, धोनीच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. धोनीच्या निवृत्तीवरून क्रिकेटप्रेमी आणी आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये मतभिन्नता आहे. धोनी हा भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज