अ‍ॅपशहर

एमसीए निवडणूक १० नोव्हेंबरला

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक येत्या नोव्हेंबरमधील १० तारखेला होणार असल्याचे, असोसिएशनशी संबंधित सुत्राने शुक्रवारी सांगितले. ही निवडणूक बीसीसीआय, एमसीएच्या जुन्या नियम व पद्धतीनुसार होणार असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने ठरवलेल्या शिफारशींवरही असोसिएशनला अवलंबून राहावे लागेल, असेदेखील सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Maharashtra Times 9 Sep 2017, 4:00 am
मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक येत्या नोव्हेंबरमधील १० तारखेला होणार असल्याचे, असोसिएशनशी संबंधित सुत्राने शुक्रवारी सांगितले. ही निवडणूक बीसीसीआय, एमसीएच्या जुन्या नियम व पद्धतीनुसार होणार असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने ठरवलेल्या शिफारशींवरही असोसिएशनला अवलंबून राहावे लागेल, असेदेखील सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai cricket association election on november 10
एमसीए निवडणूक १० नोव्हेंबरला


याआधी एमसीएची निवडणूक २०१५मध्ये पार पडली होती. तेव्हा माजी केंद्रियमंत्री शरद पवार अध्यक्षपदी निवडून आले होते. मात्र लोढा समितीच्या शिफारशींमध्ये ७० वर्षांवरील व्यक्ती पद भूषवू शकत नाही, अशी शिफारस आली आणि पवार यांनी पदत्याग केला. तेव्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची एमसीए अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

ही माहिती देणाऱ्या सुत्राने हेदेखील सांगितले की, जानेवारी २०१८मध्ये एमसीए ‘मुंबई प्रीमियर लीग’चे आयोजनही करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज