अ‍ॅपशहर

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतून विजयचं पुनरागमन

गेले काही महिने मनगटाच्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर राहावं लागलेला सलामीवीर मुरली विजयचं विराटसेनेत पुनरागमन झालं आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली.

Maharashtra Times 23 Oct 2017, 3:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murali vijay back in squad for sri lanka tests
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतून विजयचं पुनरागमन


गेले काही महिने मनगटाच्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर राहावं लागलेला सलामीवीर मुरली विजयचं विराटसेनेत पुनरागमन झालं आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली. त्यात मुरलीच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं असून अभिनव मुकुंदला वगळण्यात आलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर, १६ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध श्रीलंका या शेजाऱ्यांमध्ये कसोटी मालिका रंगणार आहे. पहिली कसोटी इडन गार्डन्सवर, तर दुसरी कसोटी नागपुरात (२४ नोव्हेंबरपासून) होणार आहे. मुरली विजय 'फिट' असल्यानं टीम इंडियाच्या सलामीचा प्रश्न सुटला आहे.

भारताच्या फिरकी गोलंदाजीची धुरा आर. अश्विन, रवींद्र जाडेडा आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल, तर उमेश यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्मा नवा चेंडू हाताळतील. ऑल राउंडर हार्दिक पंड्याचा पर्यायही कर्णधार विराट कोहलीकडे असेलच. वृद्धिमान साहा यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळणार असून अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल.

भारतीय संघ असाः

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज