अ‍ॅपशहर

आयुष्य संपत नाही, आशा सोडू नका!- विराट

आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं कठीणप्राय आव्हानं पार करून भारतीय क्रिकेटप्रेमींना भरभरून आनंद देणारा विराट कोहली आज त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पुढे सरसावला आहे. आशा सोडू नका, ही फक्त सुरुवात आहे, असं सांगत त्यानं क्रिकेटचाहत्यांच्या मनात नवी उमेद जागवण्याचा प्रयत्न केलाय.

Maharashtra Times 1 Apr 2016, 7:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम never lose hope life never ends virat tweets
आयुष्य संपत नाही, आशा सोडू नका!- विराट


आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं कठीणप्राय आव्हानं पार करून भारतीय क्रिकेटप्रेमींना भरभरून आनंद देणारा टीम इंडियाचा वीर विराट कोहली आज त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पुढे सरसावला आहे. आशा सोडू नका, ही फक्त सुरुवात आहे, असं सांगत त्यानं विंडीजविरुद्धच्या पराभवानं निराश झालेल्या क्रिकेटचाहत्यांच्या मनात नवी उमेद जागवण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्ल्ड टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडीजनं भारतावर सात विकेट्स आणि दोन चेंडू राखून थरारक विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात धडक मारली. या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं. विराट कोहलीच्या अफलातून खेळीनंतर सोपा वाटणारा विजय हळूहळू कठीण होत गेला आणि अखेर सिमन्सनं हा घास हिरावूनच घेतल्यानं क्रिकेटप्रेमी हळहळलेत. त्यांना धीर देण्यासाठी विराट कोहलीनं क्रिकेटपटू आमीर हुसैनचा व्हिडिओ शेअर केलाय आणि आयुष्य संपत नसतं, आशा सोडू नका, असा मंत्र आपल्या चाहत्यांना दिलाय.
Never lose hope, life never ends, it only begins. Hats off to this young man. https://t.co/zL057q9L66 — Virat Kohli (@imVkohli) April 1, 2016
जम्मू-काश्मीरमधील आमीर हुसैन या क्रिकेटपटूची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या आमीरला एका अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागले. परंतु, आजही तो तितकंच चांगलं क्रिकेट खेळतो. मानेनं बॅट धरून फलंदाजी करण्याचं आणि पायानं गोलंदाजी करण्याचं कौशल्य त्यानं मेहनतीनं आत्मसात केलंय. त्याची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास पाहा आणि निराशा झटकून टाका, असा संदेशच विराट कोहलीनं दिलाय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज