अ‍ॅपशहर

मुख्य प्रशिक्षकाबाबत अद्याप निर्णय नाही: BCCI

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीचा निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं सांगत बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्या निवडीचे वृत्त फेटाळले आहे. क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटी अर्थात सीएसीने प्रशिक्षकाबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.

Maharashtra Times 11 Jul 2017, 7:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no decision on new team india coach yet says bcci
मुख्य प्रशिक्षकाबाबत अद्याप निर्णय नाही: BCCI


भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीचा निर्णय अद्याप व्हायचा आहे, असं सांगत बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्या निवडीचे वृत्त फेटाळले आहे. क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटी (CAC) ने प्रशिक्षकाबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.

रवी शस्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वी मीडियातून देण्यात आलं होतं. यामुळे बीसीसीआयला तातडीने हे स्पष्टीकरण द्यावं लागलं. 'मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीचा निर्णय झालेला नाही. सीएसीने अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही', असं बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितलं. 'तसंच प्रशिक्षक निवडीबाबत मीडियातून जे काही चालवण्यात येत आहे त्यात कुठलंही तथ्य नाही', असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.

अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या पाच जणांच्या सीएसीने सोमवारी मुलाखती घेतल्या. पण प्रशिक्षकाच्या निवडीचा निर्णय राखून ठेवला. सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर हे या CAC चे तीन सदस्य आहेत. आणि ही सीएसी मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज