अ‍ॅपशहर

'पाकिस्तानशी लढत अन्य लढतींप्रमाणेच'

भारत-पाकिस्तान लढत क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच उत्कंठा वाढवणारी असते मात्र आम्ही अन्य सामन्यांप्रमाणेच याकडे पाहत आहोत. भारतासाठी खेळत असताना प्रत्येक सामना आम्हाला तितकाच महत्त्वाचा ठरतो. कोणाचा बदला घेण्यासाठी नाही, तर जिंकण्याच्या इर्षेने खेळायचं, हे आमचं सूत्र आहे, असे विराट म्हणाला.

Maharashtra Times 24 May 2017, 6:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nothing changes in our head when we face pakistan virat kohli
'पाकिस्तानशी लढत अन्य लढतींप्रमाणेच'


चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान महालढतीकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या लढतीसाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले आहे. भारत-पाकिस्तान लढत क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच उत्कंठा वाढवणारी असते मात्र आम्ही अन्य सामन्यांप्रमाणेच याकडे पाहत आहोत. भारतासाठी खेळत असताना प्रत्येक सामना आम्हाला तितकाच महत्त्वाचा ठरतो. कोणाचा बदला घेण्यासाठी नाही, तर जिंकण्याच्या इर्षेने खेळायचं, हे आमचं सूत्र आहे, असे विराट म्हणाला.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना होत असून त्याआधी विराटने आज पत्रकारांशी संवाद साधला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची सलामीची लढत ४ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असून अर्थातच विराटला सगळ्यात आधी त्याबाबतच्या प्रश्नांनाच उत्तरं द्यावी लागली.

विराट काय म्हणाला?

- वर्ल्डकपमध्ये 'कमबॅक' करण्याच्या अनेक संधी मिळतात मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्या सामन्यापासूनच जिंकावं लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

- धोनी आणि युवराज हे दोन असे खेळाडू आहेत ज्यांना काहीही सांगायची गरज नाही. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि या स्पर्धेत संघाची मजबूत भींत म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहत आहे.

- गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित आणि शिखरने चांगली सलामी दिली होती. अश्विन आणि जाडेजानेही चमकदार कामगिरी केली होती. आताही यांच्यावर मदार असणार आहे.

- चॅम्पियन्स ट्रॉफी राखण्याचे सर्वात पहिले आव्हान आमच्यापुढे असणार आहे. कसोटीमध्ये दमदार कामगिरी करून ज्याप्रकारे आम्ही पहिलं स्थान भक्कम केलं आहे त्याच 'माइंड सेट'ने आम्हाला या स्पर्धेत खेळावं लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज