अ‍ॅपशहर

पाच बळींनंतर जाडेजाच ‘आऊट’

भारताचा सलामीवीर रवींद्र जाडेजाने दुसऱ्या कसोटीत पाच बळी घेत सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला खरा, पण श्रीलंकेचा सलामीवीर करुणारत्ने क्रीझमध्ये असतानाही त्याच्यादिशेने चेंडू फेकल्यामुळे जाडेजावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली.

Maharashtra Times 7 Aug 2017, 1:54 am
गैरवर्तनाबद्दल एका सामन्याची बंदी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one test ban on jadeja
पाच बळींनंतर जाडेजाच ‘आऊट’


कोलंबो : भारताचा सलामीवीर रवींद्र जाडेजाने दुसऱ्या कसोटीत पाच बळी घेत सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला खरा, पण श्रीलंकेचा सलामीवीर करुणारत्ने क्रीझमध्ये असतानाही त्याच्यादिशेने चेंडू फेकल्यामुळे जाडेजावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. १२ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जाडेजा खेळू शकणार नाही. जाडेजाऐवजी तिसऱ्या कसोटीत कुलदीप यादव याला संधी मिळेल.

गेल्या वर्षभरात अशा गैरवर्तनाबद्दल जाडेजाचे सहा गुण जमा झाले आहेत. त्यात त्याने करुणारत्नेच्या दिशेने फेकलेल्या चेंडूची भर पडली. त्याचे हे कृत्य धोकादायक असल्याचा निर्वाळा पंचांनी दिला. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या चुकांबद्दलच्या गुणांत तीन गुणांची भर पडली. या कारवाईसह त्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कमही कापून घेतली जाणार आहे. (लेव्हल २ चे गैरकृत्य).जाडेजाने आयसीसीचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्यासमोर आपल्या कृत्याची कबुली दिली आणि दिलेली शिक्षाही मान्य असल्याचे कबूल केले.

मैदानावरील पंच ब्रुस ऑक्सफर्ड व रॉड टकर यांनी जाडेजाच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता.

जाडेजाच्या या कृत्यामुळे त्याच्या या गुणांत ३ ची भर पडल्यामुळे त्याचे असे एकूण चार गुण झाले. त्यामुळे आचारसंहितेच्या ७.६ नियमानुसार निलंबनाचे २ गुण झाले आहेत. आता २४ महिन्यात पुन्हा त्याच्याकडून गैरकृत्य झाले आणि अशा कृत्याबद्दल नोंदविल्या जाणाऱ्या गुणांची संख्या ८ किंवा अधिक झाली तर त्याला २ कसोटी किंवा चार वनडे किंवा चार टी-२०साठी निलंबित केले जाईल.

> जाडेजावर एका सामन्याची बंदी
> तिसऱ्या कसोटीला मुकणार
> कुलदीप यादव याला संधी
> पुन्हा गैरवर्तन झाल्यास दोन कसोटींची बंदी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज