अ‍ॅपशहर

आता लक्ष ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरः कोहली

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यश मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने लक्ष केंद्रित केले आहे ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेवर. या मालिकेला २३ फेब्रुवारीपासून पुणे कसोटीने सुरुवात होते आहे. मोसमातील यशस्वी झंझावात ऑस्ट्रेलियाविरुद्धही सुरू ठेवण्याचा निर्धार विराट कोहली आणि कंपनीने केला आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघ हा तोडीचा आहे, त्यांच्याविरुद्धचे यश भारतीय संघाच्या लौकिकात भर टाकेल.

Maharashtra Times 14 Feb 2017, 1:03 am
हैदराबादः बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यश मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने लक्ष केंद्रित केले आहे ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेवर. या मालिकेला २३ फेब्रुवारीपासून पुणे कसोटीने सुरुवात होते आहे. मोसमातील यशस्वी झंझावात ऑस्ट्रेलियाविरुद्धही सुरू ठेवण्याचा निर्धार विराट कोहली आणि कंपनीने केला आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघ हा तोडीचा आहे, त्यांच्याविरुद्धचे यश भारतीय संघाच्या लौकिकात भर टाकेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम our hearts and minds are already on australia series kohli
आता लक्ष ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरः कोहली


‘मला असे वाटते की इंग्लंडविरुद्धची मालिका भारतासाठी सर्वात मोठी मालिका होती; पण ती ४-० अशी सहज जिंकण्यात आपल्याला यश आले. आता हाच सिलसिला ऑस्ट्रेलियाविरुद्धही कायम राखायचा आहे’, बांगलादेशविरुद्धच्या मालिकाविजयानंतर कोहली म्हणाला. बांगलादेशला दोनवेळा बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागल्याचे हैदराबाद कसोटीत दिसले. मात्र सलग चार मालिकेत चार द्विशतके झळकावण्याचा पराक्रम करणाऱ्या कोहलीला गोलंदाजांची हैदराबादमधील कामगिरी भावली. ‘हैदराबादची खेळपट्टी फलंदाजांना पोषक होती. त्यामुळे स्कोअरबोर्डवरील मोठी धावसंख्या भारताला फायदेशीर ठरली. बांगलादेशनेही पहिल्या डावांत छान फलंदाजी केली. त्या पार्श्वभूमीवरच मी म्हणतो की भारताच्या गोलंदाजांनी भरीव कामगिरी केली. त्यांना सूर गवसला आहे जे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी होणे आवश्यक होते’, असा मुद्दा कोहलीने मांडला.

इशांत शर्माचा विशेष उल्लेख करताना भारताच्या कर्णधाराने तेज गोलंदाज आणि स्पिनर्समधील समन्वयाचेही कौतुक केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज