अ‍ॅपशहर

म्हणून मी आत्महत्या करणार होतो: पाक प्रशिक्षक

आयसीसी विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताचा संघाला जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. स्वत: आर्थर यांनीच ही कबुली दिली आहे. १६ जून रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकचा ८९ धावांनी पराभव झाला. या नंतर पाक संघाला प्रसारमाध्यमे, प्रशंसक, माजी क्रिकेटपटूंकडून मोठी टीका सहन करावी लागली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2019, 3:03 pm
लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistani-coach-mickey-arth

आयसीसी विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताचा संघाला जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. स्वत: आर्थर यांनीच ही कबुली दिली आहे. १६ जून रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकचा ८९ धावांनी पराभव झाला. या नंतर पाक संघाला प्रसारमाध्यमे, प्रशंसक, माजी क्रिकेटपटूंकडून मोठी टीका सहन करावी लागली होती.

गेल्या रविवारी आर्थर यांनी आत्महत्येचा विचार केल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. आर्थर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, 'हा पराभव एकाच सामन्यातील होता. हे सर्व पटापट झाले. तुम्ही एक सामना जिंकता आणि एक हारता. ही विश्वचषक स्पर्धा आहे. प्रसारमाध्यमांकडून होणारी टीका, लोकांच्या अपेक्षा आणि पुन्हा आपले अस्तित्व टिकवण्या प्रश्न,.... आम्ही खूप काही सहन केले'

या पराभवानंतर पाकिस्तानने पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वत:चे स्थान राखले. या पुढील सर्ल सामन्यांमध्ये पाकिस्तान संघ उत्तम कामगिरी करेल असा विश्वासही आर्थर यांनी व्यक्त केला. हा केवळ एकच असा सामना होता, या पुढे आपल्याला चांगलीच कामगिरी करायची आहे, असे आम्ही खेळाडूंना सतत सांगत आहोत, असेही आर्थर म्हणाले.

या विश्वचषकात आतापर्यंत ६ सामने खेळलेल्या पाकिस्तानच्या नावापुढे ५ गुण आहेत. पाक सध्या गुणफलकावर सातव्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकला उर्वरित सर्व ३ सामने जिंकावे लागणार आहेत. पाकचा पुढील मुकाबला बुधवारी न्यूझीलंडशी होत आहे. त्यानंतर पाकिस्तान शनिवारी अफगाणिस्तान आणि ५ जुलैला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज