अ‍ॅपशहर

डोक्याला चेंडू लागून पाक क्रिकेटपटूचा मृत्यू

गेल्या काही वर्षांत डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटू जखमी अथवा मृत होण्याचे प्रमाण वाढलेले असताना पाकिस्तानातील एका स्थानिक सामन्यात उसळत्या चेंडूमुळे एका उदयोन्मुख क्रिकेटपटूचे निधन झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Maharashtra Times 17 Aug 2017, 4:00 am
वृत्तसंस्था, कराची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistani cricketer dies after being hit by a bouncer
डोक्याला चेंडू लागून पाक क्रिकेटपटूचा मृत्यू


गेल्या काही वर्षांत डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटू जखमी अथवा मृत होण्याचे प्रमाण वाढलेले असताना पाकिस्तानातील एका स्थानिक सामन्यात उसळत्या चेंडूमुळे एका उदयोन्मुख क्रिकेटपटूचे निधन झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

झुबेर अहमद असे या क्रिकेटपटूचे नाव असून त्याने खेळताना हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे चेंडू त्याच्या डोक्यावर आदळल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने झुबेरच्या या अपघाती मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले आणि हेल्मेटशिवाय खेळू नका, असे आर्जवही यानिमिताने केले आहे.

तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजेसचाही चेंडू मानेवर आदळल्यानंतर मृत्यु ओढवला होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यालाही नुकताच ऑस्ट्रेलियाच्याच जोश हॅझलवूडचा चेंडू डोक्यावर लागला होता. त्यात तो जखमी झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज