अॅडलेड : भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा झेल पकडून कसोटीचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी केली आहे. एका कसोटी डावात सर्वाधिक झेल पकडण्याचा पराक्रम धोनीच्या नावावर होता. तेवढेच सहा झेल यावेळी पंतने घेतले. पंतने मिचेल स्टार्क, ट्राविस हेड, जोश हेझलवूड यांना तिसऱ्या दिवशी तर उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकॉम्ब व टीम पेन यांना दुसऱ्या दिवशी झेलचीत केले होते. धोनीने २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे ही कामगिरी केली होती.
पंतची धोनीशी बरोबरी
भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा झेल पकडून कसोटीचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी केली आहे...
PTI 9 Dec 2018, 4:00 am