अ‍ॅपशहर

फिक्सिंगमुळे पाकिस्तानचा इरफान निलंबित

पाकिस्तान सुपर लीगदरम्यान बुकीच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेला तेज गोलंदाज महम्मद इरफान याला मंगळवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) तात्पुरते निलंबित केले आहे. या लीगदरम्यान भ्रष्टाचाराचा आरोप असलेला तो तिसरा पाकिस्तानी खेळाडू आहे.

Maharashtra Times 15 Mar 2017, 4:00 am
कराचीः पाकिस्तान सुपर लीगदरम्यान बुकीच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेला तेज गोलंदाज महम्मद इरफान याला मंगळवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) तात्पुरते निलंबित केले आहे. या लीगदरम्यान भ्रष्टाचाराचा आरोप असलेला तो तिसरा पाकिस्तानी खेळाडू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pcb suspends mohammad irfan in spot fixing case
फिक्सिंगमुळे पाकिस्तानचा इरफान निलंबित


पीसीबीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमानुसार इरफानला नोटीस बजावण्यात आली आहे. इरफानवर नियम २.४.४ प्रकरणातील दोन नियमांचा भंग केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहे. त्याला या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्वरित परिणाम म्हणून त्याच्यावर क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. इरफानला पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला सामोरे जावे लागले. त्यात त्याने बुकींनी स्पॉट फिक्सिंग संदर्भात आपली भेट घेतल्याचे मान्य केले. बुकींची कुठलीही ऑफर स्वीकारली नसल्याचे इरफान म्हणत असला, तरी बुकींनी आपल्याशी संपर्क साधल्याची बाब त्याने बोर्डापासून लपवून ठेवली. आईच्या निधनामुळे आपल्याला जबर मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून आपल्यावर मानसिक दबाव असल्याचे कारण त्याने पुढे केले.

इरफान पाकिस्तानकडून चार कसोटी, ६० वनडे आणि २० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला आहे. यापूर्वी शार्जील खान आणि खलिद लतीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे तिन्ही खेळाडू दोषी आढळले तर त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात येणार असल्याचे पीसीबीचे चेअरमन शाहरयार खान यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज