अ‍ॅपशहर

मुंबई संघात अल्मेडा, केरकरचा समावेश

दुखापतींनी ग्रस्त असलेल्या मुंबई रणजी संघात हैदराबादच्या संघाचा सामना करण्यापूर्वी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई-हैदराबाद ही उपांत्यपूर्व फेरीची लढत २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत रायपूर येथे होत आहे.

Maharashtra Times 20 Dec 2016, 12:00 am
मुंबई : दुखापतींनी ग्रस्त असलेल्या मुंबई रणजी संघात हैदराबादच्या संघाचा सामना करण्यापूर्वी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई-हैदराबाद ही उपांत्यपूर्व फेरीची लढत २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत रायपूर येथे होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम players selected for ranji trophy quarter final match against hyderabad
मुंबई संघात अल्मेडा, केरकरचा समावेश


दुखापतीमुळे सलामीवीर अखिल हेरवाडकर, शुभम रांजणे आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हे संघाबाहेर असतील. त्याजागी पुरुषोत्तम ढाल क्रिकेट स्पर्धेत त्रिशतकाचा विक्रम करणारा एम.आय.जी.चा केव्हिन अल्मेडा याची निवड झाली आहे. मुंबईच्या या १५ खेळाडूंच्या संघात एकनाथ केरकरचाही समावेश झाला आहे. केरकरने पुरुषोत्तम ढाल स्पर्धेत १३१ आणि १८० अशा दोन शतकी खेळी केल्या होत्या. पोलिस ढाल स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने दोन्ही डावात शतके ठोकली होती. पंजाबविरुद्धच्या सामन्यात न खेळलेले प्रफुल्ल वाघेला, बलविंदरसिंग संधू, विजय गोहिल यांनाही मुंबई संघात स्थान मिळाले आहे.

मुंबईचा संघ : आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, प्रफुल्ल वाघेला, केव्हिन अल्मेडा, शार्दुल ठाकूर, बलविंदरसिंग संधू (ज्यु.), तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, सुफियाँ शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप व एकनाथ केरकर.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज