अ‍ॅपशहर

हरमनप्रीतने उलगडले फटकेबाजीचे 'गुपित'

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या उपान्त्य सामन्यात १७१ धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हरमनने केलेल्या जोरदार फटकेबाजीबद्दल तिचं विशेष कौतुक होत आहे. याचं रहस्य तिनं नुकतंच माध्यामांसमोर उलगडलं. तिच्या खेळाच संपूर्ण श्रेय तिच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात ती ज्या मुलांसोबत क्रिकेट खेळायची त्यांना देते.

Maharashtra Times 27 Jul 2017, 2:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम playing with boys helped mes says harmanpreet kaur
हरमनप्रीतने उलगडले फटकेबाजीचे 'गुपित'

महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या उपान्त्य सामन्यात १७१ धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हरमनने केलेल्या जोरदार फटकेबाजीबद्दल तिचं विशेष कौतुक होत आहे. याचं रहस्य तिनं नुकतंच माध्यामांसमोर उलगडलं. तिच्या खेळाच संपूर्ण श्रेय तिच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात ती ज्या मुलांसोबत क्रिकेट खेळायची त्यांना देते.

मला लहान असल्यापासूनच अशाप्रकारची बॅटिंग करायला आवडते, मी लहान असताना मुलांसोबतच अधिक क्रिकेट खेळायची आणि ते ज्या पद्घतीने षटकार मारायचे त्यांना बघूनच मी सुद्धा षटकार मारायला शिकले, असे हरमनप्रीतने सांगितले.

वर्ल्डकपच्या कामगिरीबद्दल विचारलं असता हरमनप्रीत म्हणते की अंतिम फेरीत आम्हाला धावांची जास्त गरज होती,आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न सुध्दा करत होते.
भारतीय महिला संघाच्या कौतुकासाठी आज राजधानी दिल्लीत तीन ठिकाणी सन्मान सोहळे आयोजित केले आहेत. आधी क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार होणार आहे, त्यानंतर बीसीसीआयकडून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंना प्रत्येकी ५०-५० लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे भवनात रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंकडून देखील या महिला टीमचा सत्कार केला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज