अ‍ॅपशहर

पोलार्ड मांजरेकरांवर संतापला

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये, समालोचक संजय मांजरेकर यांनी केलेल्या टीकेवर कायरन पोलार्ड चांगलाच संतापला. ट्विटरवरून मांजरेकरांना ‘व्हर्बल डायरिया’ झाल्याची टीका करताना, पोलार्डचा तोल ढासळला आहे.

Maharashtra Times 11 Apr 2017, 12:27 am
मुंबईः आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये, समालोचक संजय मांजरेकर यांनी केलेल्या टीकेवर कायरन पोलार्ड चांगलाच संतापला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pollard slams manjrekar for his on air comments
पोलार्ड मांजरेकरांवर संतापला


ट्विटरवरून मांजरेकरांना ‘व्हर्बल डायरिया’ झाल्याची टीका करताना, पोलार्डचा तोल ढासळला आहे. ‘मांजरेकर तुम्हाला बोलण्यासाठीच पैसे मिळतात. त्यामुळे तुम्ही ‘व्हर्बल डायरिया’ सुरूच ठेवा. पण, तोंडून बाहेर आलेला शब्द परत घेता येत नाहीत,’ असे त्याने ट्विटरवर म्हटले आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये पोलार्ड १७ धावांवर बाद झाला. त्यावर पोलार्ड हा अखेरच्या सहा-सात षटकांमध्ये फलंदाजी करण्यासाठीच योग्य असल्याचे मांजरेकर यांनी म्हटले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज