अ‍ॅपशहर

पृथ्वी ‘आउट’; अगरवाल ‘इन’

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी सावची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी हुकली आहे...

Maharashtra Times 18 Dec 2018, 4:01 am
पर्थ : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी सावची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी हुकली आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयने सोमवारी स्पष्ट केले. त्याच्या जागी मयंक अगरवालची निवड करण्यात आली आहे. पृथ्वीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात डाव्या पायाचा घोटा दुखावला होता. या लढतीत १९ वर्षीय मुंबईकर पृथ्वीने ६६ धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, लोकेश राहुल पहिल्या दोन कसोटीत अपयशी ठरला आहे. त्याला अॅडलेडमध्ये २, ४४ धावाच करता आल्या, तर पर्थमध्ये २ आणि ० धावांवरच तो बाद झाला. त्यामुळे २७ वर्षीय अगरवालला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. अष्टपैलू हार्दिक पंड्याचा तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तिसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prithvi shaw ruled out of test series in australia mayank agarwal named replacement
पृथ्वी ‘आउट’; अगरवाल ‘इन’


भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, महंमद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, हार्दिक पंड्या आणि मयंक अगरवाल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज