अ‍ॅपशहर

पिच फिक्सिंगमुळे टीम इंडिया हादरली

मॅच फिक्सिंगच्या कटू आठवणीतून क्रिकेटविश्व बाहेर पडत असतानाच 'पिच फिक्सिंग' प्रकरण उघडकीस आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भारत-न्यूझीलंड दरम्यान आज पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी खेळपट्टी फिक्स करण्यात आल्याचं एका स्टिंगमधून उघड झालं आहे. मात्र बीसीसीआयने आजचा सामना होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Times 25 Oct 2017, 12:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune pitch curator seen giving inside information in sting operation before of ind nz odi
पिच फिक्सिंगमुळे टीम इंडिया हादरली


मॅच फिक्सिंगच्या कटू आठवणीतून क्रिकेटविश्व बाहेर पडत असतानाच 'पिच फिक्सिंग' प्रकरण उघडकीस आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भारत-न्यूझीलंड दरम्यान आज पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी खेळपट्टी फिक्स करण्यात आल्याचं एका स्टिंगमधून उघड झालं आहे. मात्र बीसीसीआयने आजचा सामना होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे स्टिंग ऑपरेशन करून पिच फिक्सिंगचा पर्दाफाश केला आहे. स्टिंग ऑपरेशन करताना या पत्रकाराने पिच क्युरेटरला दोन खेळाडूंसाठी खेळपट्टीत थोडा बदल करण्यास सांगितलं. त्यावर पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर तात्काळ हा बदल करण्यास तयार झाला. ३३७ धावा निघतील अशी खेळपट्टी आम्ही तयार केलीय. त्यामुळे या धावसंख्येचा सहज पाठलाग करणे शक्य आहे, असं या पिच क्युरेटरने पत्रकाराला सांगितलं.

नियमानुसार क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकाशिवाय कुणालाही खेळपट्टी दाखवली जात नाही. पण या पत्रकाराच्या सांगण्यावरून पांडुरंग त्याला खेळपट्टी दाखविण्यासही तयार झाला. काही मिनिटातच खेळपट्टीत बदल होईल, असं सांगतानाच या पिच क्युरेटरने त्या पत्रकाराला खिळे असलेले बूट घालून खेळपट्टीवर जाण्यास परवानगीही दिल्याचं या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं आहे. दरम्यान, आमच्या क्युरेटरने खेळपट्टीची पाहणी केली आहे. खेळपट्टी व्यवस्थित असल्याने आजचा सामना होईल, असं बीसीसीआचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी सांगितलं.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा सामना आज दुपारी १.३० वाजता होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज