अ‍ॅपशहर

...तर स्मिथऐवजी अजिंक्य कर्णधार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरॉन बँक्रॉफ्ट याने चेंडूचा पृष्ठभाग अनधिकृतरित्या घासण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात कर्णधार स्टीव्ह स्मिथवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आयपीएलमधील स्मिथ व वॉर्नर यांचे स्थान काय याविषयी संभ्रम आहे. स्मिथला जर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले तर ती जागा अजिंक्य रहाणे घेईल, असे कळते.

PTI 26 Mar 2018, 12:07 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahane

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरॉन बँक्रॉफ्ट याने चेंडूचा पृष्ठभाग अनधिकृतरित्या घासण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात कर्णधार स्टीव्ह स्मिथवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आयपीएलमधील स्मिथ व वॉर्नर यांचे स्थान काय याविषयी संभ्रम आहे. स्मिथला जर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले तर ती जागा अजिंक्य रहाणे घेईल, असे कळते.

स्मिथला कर्णधारपदी ठेवून वाद निर्माण करण्याची इच्छा त्या संघाची नसेल. पण राजस्थान रॉयल्स संघाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बीसीसीआय आणि राजस्थान रॉयल्स तसेच सनरायझर्स हैदराबाद हे यासंदर्भात 'थांबा आणि वाट पाहा' या भूमिकेत आहेत. कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही, असे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज