अ‍ॅपशहर

प्रशिक्षकपदी द्रविड कायम

भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड पुढील दोन वर्षांसाठी कायम राहणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले.

Maharashtra Times 1 Jul 2017, 4:00 am
नवी दिल्ली : भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड पुढील दोन वर्षांसाठी कायम राहणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul dravid to continue as india a and u 19 coach
प्रशिक्षकपदी द्रविड कायम


द्रविडची २०१५मध्ये या दोन्ही संघांच्या प्रशिक्षपदी निवड झाली होती. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने मायदेशात आणि परदेशात चमकदार कामगिरी केली. २०१६च्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. भारतीय क्रिकेटची दुसरी फळी घडविण्याचे श्रेय द्रविडला जाते.

भारत अ संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या संघासोबत द्रविडही असेल. ‘मागील दोन वर्षांत युवा खेळाडूंची चांगली फळी तयार झाली आहे. हे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरीस सज्ज आहेत. म्हणूनच द्रविडचा करार पुढील दोन वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे,’ असे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज