अ‍ॅपशहर

अखिलमुळे मुंबईला आघाडी

अखिल हेरवाडकरच्या खणखणीत शतकामुळे मुंबईने शुक्रवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या झुंजीत पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. मॉडेल क्रीडा संकुलातील पाल्म ए मैदानावर सुरू असलेल्या या झुंजीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोद्याला दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला मुंबईने ३०५ धावांत गुंडाळसे. दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला तेव्हा मुंबईने ८ बाद ३१३ धावांची मजल मारली होती, तर बलविंदर संधू ५६, तर तुषार देशपांडे १८ धावांवर खेळत होते.

Maharashtra Times 15 Oct 2016, 3:08 am
नवी दिल्ली ः अखिल हेरवाडकरच्या खणखणीत शतकामुळे मुंबईने शुक्रवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या झुंजीत पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. मॉडेल क्रीडा संकुलातील पाल्म ए मैदानावर सुरू असलेल्या या झुंजीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोद्याला दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला मुंबईने ३०५ धावांत गुंडाळसे. दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला तेव्हा मुंबईने ८ बाद ३१३ धावांची मजल मारली होती, तर बलविंदर संधू ५६, तर तुषार देशपांडे १८ धावांवर खेळत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ranji trophy herwadkar ton lifts mumbai
अखिलमुळे मुंबईला आघाडी


मुंबईला बडोद्यावर आघाडी घेता आली ती अखिल हेरवाडकरने २१६ चेंडूंमध्ये केलेल्या १०६ धावांच्या खेळीमुळे. मुंबईकडून सूर्यकुमार यादव (५४), वलविंदर संधू यांनी अखिलला छान साथ दिली. संधूने नाबाद ५६ धावांची खेळी केली. बडोद्याकडून चमक दाखवली ती सागर मंगलोरकरने. त्याने ७४ धावांत तीन विकेट्स टिपल्या. फलंदाजीत १९ धावांचे योगदान देणारा बडोद्याचा कर्णधार इरफान पठाणने गोलंदाजी करताना फारशा धावा दिल्या नसल्या तरी त्याला एकच मोहरा टिपता आला. बडोद्याच्या ३०५ धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईची सुरुवात अडखळती झाली. श्रेयस अय्यर व जय बिस्ता हे भरवशाचे फलंदाज संघाच्या १८ धावा झाल्या असताना माघारी परतले. अखिल हेरवाडकरने सूर्यकुमार यादवला बरोबर घेत ८१ धावांची भागीदारी रचली.

स्कोअरबोर्डः बडोदे ३०५ (पिनल शहा ६६, दीपक हुडा ४६, युसूफ पठाण ४१; विजय गोहिल ७० धावांत ३ मोहरे, शार्दूल ठाकूर ८२ धावांत २ मोहरे) वि. मुंबई ८ बाद ३१३ (अखिल हेरवाडकर १०६, सूर्यकुमार यादव ५४, संधू खेळत आहे ५६; मंगलोरकर ७४ धावांत ३ विकेट्स).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज