नवी दिल्ली : वर्ल्डकपच्या अंतिम फेरीमध्ये नियमांच्या आधारे जाहीर केलेल्या पराभवानंतरही, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने दाखविलेली प्रगल्भता वाखाणण्या जोगी आहे. त्याला सलामच करायला हवा, अशी प्रतिक्रिया भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. या सामन्यामध्ये निर्णय विरोधात जात असतानाही, विल्यमसनने संयम ढळू दिला नाही आणि ४८ तासांनंतरही तो शांत राहिला, हे खूपच उल्लेखनीय आहे, असेही शास्त्री यांनी नमूद केले.
रवी शास्त्री यांनी केले विल्यमसनचे कौतुक
वर्ल्डकपच्या अंतिम फेरीमध्ये नियमांच्या आधारे जाहीर केलेल्या पराभवानंतरही, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने दाखविलेली प्रगल्भता वाखाणण्या जोगी आहे...
महाराष्ट्र टाइम्स 18 Jul 2019, 4:48 am