अ‍ॅपशहर

'महागुरू' कोण?; रवी शास्त्रीही मैदानात

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर विराटसेनेचा नवा 'महागुरू' कोण?, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना रवी शास्त्रीनेही या शर्यतीत उडी घेतली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपण अर्ज करणार आहे, असे शास्त्रीने एका इंग्रजी दैनिकाला सांगितले.

Maharashtra Times 27 Jun 2017, 7:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi shastri throws name in india coach hat reports
'महागुरू' कोण?; रवी शास्त्रीही मैदानात


भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर विराटसेनेचा नवा 'महागुरू' कोण?, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना रवी शास्त्रीनेही या शर्यतीत उडी घेतली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपण अर्ज करणार आहे, असे शास्त्रीने एका इंग्रजी दैनिकाला सांगितले.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार होता. मात्र वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत कुंबळेने पदाची धुरा सांभाळावी, असे बीसीसीआयने सांगितले होते. असे असतानाच कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीतील मतभेद चव्हाट्यावर आले आणि कुंबळेने तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षकाशिवायच सध्या भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुंबळेची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून या स्पर्धेत शास्त्रीने उडी घेतल्याने रंगत आली आहे.

५५ वर्षीय शास्त्रीने भारतीय संघाचं संचालकपद सांभाळलेलं आहे. दोन वर्षांच्या कार्यकाळात २०१५मध्ये भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे शास्त्रीला पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे. शास्त्रीबरोबरच वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, डोडा गणेश, टॉम मूडी, रिचर्ड पायबस हे मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरलेले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज