अ‍ॅपशहर

इनाम मंजूर

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे...

Maharashtra Times 29 Jun 2018, 4:00 am

इनाम मंजूर

मुंबई : गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार नेमबाज तेजस्विनी सावंत, हीना सिद्धू, राहुल आवारे (कुस्ती), मधुरिका पाटकर, पूजा सहस्त्रबुद्धे, सनिल शेट्टी (सर्व टेबलटेनिसपटू) आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांना सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रत्येकी ५० लाखांचे इनाम देण्यात येईल, तर तेजस्विनी, हीना व चिराग यांनी जिंकलेल्या रौप्यपदकांबद्दल त्यांना ३० लाखांचे इनामही देण्यात येईल. टेटेपटू सनिल शेट्टीने पुरुष दुहेरीत ब्राँझ जिंकले होते, त्याबद्दल त्याला २० लाखांचे आणखी एक इनाम मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज