अ‍ॅपशहर

India Vs Ireland: रोहितचं शतक हुकलं!

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारली.

Maharashtra Times 28 Jun 2018, 11:43 am
डब्लिन : रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit the height of the peakkatubin rohit sharma and
India Vs Ireland: रोहितचं शतक हुकलं!


या लढतीत आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवनने आक्रमक सुरुवात केली. या जोडीने १६ षटकांत १६० धावांची सलामी दिली. रोहितने ६१ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ९७, तर धवनने ४५ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ७४ धावा केल्या. यानंतर रैना, धोनी, विराट कोहली यांना फटकेबाजी करण्यात अपयश आले. अखेरच्या चार षटकांत भारताने चार फलंदाज गमावले. आयर्लंडकडून चेसने चार बळी मिळवले. संक्षिप्त धावफलक : भारत - २० षटकांत ५ बाद २०८ (रोहित शर्मा ९७, शिखर धवन ७४,सुरेश रैना १०, महेंद्रसिंह धोनी ११, हार्दिक पंड्या नाबाद ६, विराट कोहली ०, मनीष पांडे नाबाद ०, चेस ४-३५, ओब्रायन १-३६) वि. आयर्लंड (अपूर्ण).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज