अ‍ॅपशहर

सचिन तेंडुलकरचे गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा खासदार सचिन तेंडुलकर याने निकृष्ट दर्जाचे हेल्मेट विकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी सचिनने परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्रही लिहिले आहे. दुचाकी वाहनांचे वाढते अपघात लक्षात घेता सुरक्षेची साधने उच्च दर्जाची असायला हवीत, असे सचिनने पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2018, 6:42 pm
नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा खासदार सचिन तेंडुलकर याने निकृष्ट दर्जाचे हेल्मेट विकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी सचिनने परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्रही लिहिले आहे. दुचाकी वाहनांचे वाढते अपघात लक्षात घेता सुरक्षेची साधने उच्च दर्जाची असायला हवीत, असे सचिनने पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin-tendualkar


सचिनने पत्रात म्हटले आहे की, 'निकृष्ट दर्जाची हेल्मेट बनवणारे आणि बनावट आयएसआय मार्कसह ते विकणारे अशांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे अशी मी आपल्या मंत्रालयाकडे विनंती करतो. मैदानात खेळताना सुरक्षेची साधने किती गरजेची आहेत याची एक खेळाडू म्हणून मला चांगली जाणीव आहे. हेल्मेटबाबत गुणवत्तेचा स्तर उच्च दर्जाचाच राखला जायला हवा.'

सचिन हा रस्ते सुरक्षेचा समर्थक म्हणून ओळखला जातो. सचिन सोशल मीडियावर हेल्मेटचा वापर करण्याचे सतत आवाहन करत आला आहे. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत कमी करण्यात यावी, जेणेकरून दुचाकी धारक रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त दरातील निकृष्ट दर्जाची हेल्मेट विकत घेणार नाहीत असे आवाहनही सचिनने केले आहे. काही दिवसांपूर्वी, प्रवाशांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करणारा सचिनचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज