अ‍ॅपशहर

'क्रिकेटचा देव' आता कॉमिक हिरोच्या रूपात

क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त होऊन पाच वर्षे उलटल्यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची क्रेझ कमी झालेली नाही. 'प्लेइंग इट माय वे' आणि 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' या चित्रपटानंतर सचिन आता पुन्हा एकदा हिरोच्या स्वरूपात पुढं येणार आहे. मात्र, यावेळचं माध्यम आहे कॉमिक बुक. कॉमिक बुकच्या हिरोच्या माध्यमातून तो चाहत्यांसमोर येणार आहे.

Maharashtra Times 18 Oct 2017, 1:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin tendulkar coming soon as comic hero
'क्रिकेटचा देव' आता कॉमिक हिरोच्या रूपात

क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्त होऊन पाच वर्षे उलटल्यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची क्रेझ कमी झालेली नाही. 'प्लेइंग इट माय वे' आणि 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' या चित्रपटानंतर सचिन आता पुन्हा एकदा हिरोच्या स्वरूपात पुढं येणार आहे. मात्र, यावेळचं माध्यम आहे कॉमिक बुक. कॉमिक बुकच्या हिरोच्या माध्यमातून तो चाहत्यांसमोर येणार आहे.

हेचेत इंडिया या कॉमिक बुकचं प्रकाशन करणार आहे. २५ पानांचं हे कॉमिक बुक खास बच्चे कंपनीला आकर्षित करण्याच्या हेतूनं तयार केलं आहे. यात सचिनचे क्रिकेट विश्वातील गाजलेले किस्से असतील. त्याचबरोबर, २४ एप्रिल १९९८ साली शारजा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यात आलेल्या क्रिकेट सामन्याचा सुद्धा समावेश करण्यात येणार आहे.

शारजामध्ये सचिननं ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी 'डेझर्ट स्टॉर्म' या नावानं प्रचलित आहे. कोकोकोला कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं भारतासमोर २७२ धावांच लक्ष्य ठेवलं होतं. सचिनच्या धुवाँधार खेळीमुळं भारतानं अवघ्या ४८.३ षटकांमध्ये २७५ धावा काढून विजय मिळवला होता.

रमाकांत आचरेकर आणि सचिन या दोघा गुरुशिष्यांचं नातं हे या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग असेल. 'सचिनच्या सहकाऱ्यांनी या पुस्तकासाठी खूप मेहनत घेतली आहे. लहान मुलांसोबतच तरुणांनाही हे पुस्तकात वाचायला आवडेल,' असं हेचेत इंडियाचे प्रकाशक थॉमस अब्राहम यांनी ही माहिती दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज