अ‍ॅपशहर

'त्या' खेळाडूंना संघाबाहेर काढाः गावसकर

अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदाच्या राजीनाम्यावरून क्रिकेटवर्तुळात जोरदार 'बॅटिंग' सुरू असताना, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी 'कोहली कंपनी'ला धारेवर धरलं आहे.

Maharashtra Times 22 Jun 2017, 3:32 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sad day for indian cricket gavaskar on kumble exit
'त्या' खेळाडूंना संघाबाहेर काढाः गावसकर


अनिल कुंबळेच्या प्रशिक्षकपदाच्या राजीनाम्यावरून क्रिकेटवर्तुळात जोरदार 'बॅटिंग' सुरू असताना, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी 'कोहली कंपनी'ला धारेवर धरलं आहे.

'चला मुलांनो, आज तुम्हाला बरं वाटत नाही ना, मग सुट्टी घ्या, शॉपिंगला जा', असं सांगणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा आहे का? जे खेळाडू कुंबळेच्या 'कठोर' प्रशिक्षण पद्धतीविरोधात तक्रार करताहेत त्यांना तर संघातून काढून टाकलं पाहिजे, असा 'स्ट्रेट ड्राइव्ह' गावसकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला आहे. गेल्या वर्षभरात अनिल कुंबळे काही चुकीचं वागलाय, असं मला तरी वाटत नाही. मतभेद तर कुठल्याही संघात असू शकतात, पण आपण निकाल पाहिला पाहिजे. कुंबळे प्रशिक्षक झाल्यापासून आपण काहीही हरलेलो नाही, त्यामुळे त्याचा राजीनामा हा भारतीय क्रिकेटसाठी वाईट दिवस आहे, असंही गावसकर यांनी नमूद केलंय.



आपली शिकवण्याची पद्धत कर्णधार विराट कोहलीला पसंत नसल्याचं कळल्यानंतर अनिल कुंबळेनं काल प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्याचा हा निर्णय दुःखद असल्याची भावना क्रिकेटवर्तुळात व्यक्त होतेय. मात्र त्याचवेळी, स्वाभिमानानं घेतलेल्या या भूमिकेचं कौतुकही होतंय. परंतु, कुंबळेचा तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय गावसकर यांना तितकासा पटलेला नाही. विराट आणि कुंबळेत नेमके काय मतभेद झाले हे मला ठाऊक नाही. पण, क्रिकेट सल्लागार समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवला असताना त्याने टिच्चून राहायला हवं होतं. राजीनाम्यामागे त्याचं काहीतरी कारण नक्कीच असेल, मात्र तो नक्कीच दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज