अ‍ॅपशहर

संदीप पाटीलना आमंत्रण नाही

भारतीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. अर्ज केलेल्या उमेदवारांना संघाविषयीच्या योजनांबद्दल मंगळवारी सादरणीकरण करायचे होते. पण यासाठी आपल्याला आमंत्रणच नव्हते, असा खुलासा पाटील यांनी केला

Maharashtra Times 22 Jun 2016, 12:45 am
नवी दिल्ली : भारतीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. अर्ज केलेल्या उमेदवारांना संघाविषयीच्या योजनांबद्दल मंगळवारी सादरणीकरण करायचे होते. पण यासाठी आपल्याला आमंत्रणच नव्हते, असा खुलासा पाटील यांनी केला. समितीने त्यांचा अर्ज बाद केला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sandeep patil coach news
संदीप पाटीलना आमंत्रण नाही


भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेले अनिल कुंबळे, प्रवीण अमरे आणि लालचंद राजपूत या माजी खेळाडूंनी मंगळवारी बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीसमोर आपल्या योजनांबाबतचे सादरीकरण केले. सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांच्या समितीने मंगळवारी प्रशिक्षकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात केली. या वेळी बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. मुलाखतींची मंगळवारी शेवटची फेरी होती. पाटील म्हणाले, समिती योग्य उमेदवाराची निवड करील. ज्यांची निवड होईल, त्याना शुभेच्छा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज