अ‍ॅपशहर

‘रेअर शेअर’मध्ये संजय बांगर

औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित 'रेअर शेअर' या संवाद कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर सहभागी होणार आहे...

Maharashtra Times 24 May 2018, 4:00 am

औरंगाबाद : औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित 'रेअर शेअर' या संवाद कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर सहभागी होणार आहे. हा संवाद कार्यक्रम सोमवारी (२८ मे) देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही. संघटनेचा हा ५१वा संवाद कार्यक्रम आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज