अ‍ॅपशहर

'टीम इंडियात मुस्लिम खेळाडू आहे का?'

भारतीय क्रिकेट संघात मुस्लिम खेळाडूचा समावेश आहे का, असा प्रश्न एका आयपीएस अधिकाऱ्यानं उपस्थित केल्यानंतर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनं चोख प्रत्युत्तर देत त्याची 'विकेट' काढली आहे.

Maharashtra Times 23 Oct 2017, 8:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjiv bhatt asked any muslim in team india harbhajan gives answer
'टीम इंडियात मुस्लिम खेळाडू आहे का?'


भारतीय क्रिकेट संघात मुस्लिम खेळाडूचा समावेश आहे का, असा प्रश्न एका आयपीएस अधिकाऱ्यानं उपस्थित केल्यानंतर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनं चोख प्रत्युत्तर देत त्याची 'विकेट' काढली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या काही वेळापूर्वीच गुजरातमधील निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी ट्विट करून भारतीय संघात आताच्या घडीला कोणी मुस्लिम खेळाडू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत भारतीय संघात मुस्लिम खेळाडूचा समावेश नाही, असं किती वेळा घडलं आहे? मुस्लिमांनी क्रिकेट खेळणं सोडून दिलं का? किंवा खेळाडूंची निवड करणारे कोणत्या अन्य खेळाचे नियम पाळताहेत का, असे प्रश्न भट्ट यांनी ट्विट आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केले.

हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई। क्रिकेट टीम में खेलने वाला हर खिलाड़ी हिंदुस्तानी है उसकी जात या रंग की बात नहीं होनी चाहिए (जय भारत) https://t.co/UVvSHaLJdY — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 23, 2017
हरभजन सिंगनं या प्रश्नांना ट्विटद्वारेच जबरदस्त उत्तर दिलं. 'हिंदू-मुस्लिम-शीख-ईसाई आपस में हैं भाई!' असं ट्विट त्यानं केलं आहे. टीम इंडियात खेळणारा प्रत्येक खेळाडू हिंदुस्तानी आहे. त्याची जात आणि वर्णाविषयी बोलू नये. जय भारत!, असं ट्विट त्यानं केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज