म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय गादिया करंडक क्रिकेट स्पर्धेत एसबीओए पब्लिक स्कूल आणि अग्रसेन विद्यामंदिर या संघांनी विजयी आगेकूच केली.
एडीसीए मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या लढतीत एसबीओए पब्लिक स्कूल संघाने नाथ व्हॅली हायस्कूल संघाचा चार विकेट्स राखून पराभव केला. यात आदित्य परदेशी, अंश ठोकळ, श्रेयस पाटील, सर्वोदया शेपाळ यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली.
दुसऱ्या सामन्यात अग्रसेन विद्यामंदिर संघाने अल्फोन्सा हायस्कूल संघावर ५१ धावांनी विजय नोंदवला. यात अनिकेत भिसे, चिन्मय दिवाण, ओमकार मोगल यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
संक्षिप्त स्कोअरबोर्ड : १) नाथ व्हॅली हायस्कूल : २० षटकात नऊ बाद ११७ (आदित्य परदेशी २५, सिद्धांत डेबरा नाबाद १६, शहाद उपळकर १४, सोहम मगरकर ७, यज्ञेश बाजपाई ७, रिशी बुनलिया ७, यश नन्नावरे नाबाद ७, इतर २१, अंश ठोकळ ४-१६, श्रेयस पाटील, आदित्य अंबिलवादे, अनंत तांबेवार, श्रीवास्तव कुलकर्णी, क्षीतिज चव्हाण प्रत्येकी एक विकेट) पराभूत विरुद्ध एसबीओए पब्लिक स्कूल : १८.४ षटकात सहा बाद ११८ (श्रेयस पाटील ३८, सर्वोदया शेपाळ नाबाद ३०, क्षीतिज चव्हाण १६, अंश ठोकळ ६, ओंकार दळवी ६, इतर १९, शहाद उपाळकर, यज्ञेश बाजपाई, रौनक राठी, रिशी बुनलिया प्रत्येकी एक विकेट). सामनावीर : श्रेयस पाटील.
२) अग्रसेन विद्यामंदिर : २० षटकात चार बाद १२२ (अनिकेत भिसे नाबाद ५६, चिन्मय दिवाण ३२, यश जैस्वाल ११, इतर १८) विजयी विरुद्ध अल्फोन्सा हायस्कूल : १३ षटकात सर्वबाद ७० (नीलेश मनाळ १३, आकाश वाघमारे १२, अभिजित डाके १२, अनिरुद्ध सरकार ७, इतर ११, ओमकार मोगल ६-१६, संस्कार सोनी २-१५, चिन्मय दिवाण, साहिल पाटील प्रत्येकी एक विकेट). सामनावीर : ओमकार मोगल.