मुंबई : २३ वर्षांखालील मुलांसाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शालिनी भालेकर निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून दादर पारसी झोराष्ट्रीयनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माटुंग्याच्या रमेश दडकर मैदानात या स्पर्धेचे उदघाटन होईल. ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत हार्दिक तामोरे (जहांगीर पीठावाला संघ), अक्षय सरदेसाई (हेमंत वायंगणकर संघ ), साईराज पाटील (दिलीप वेंगसरकर संघ), सिद्धार्थ आकरे (चंद्रशेखर संत संघ) यांच्या नेतृत्वाखाली चार संघ एकमेकांशी झुंजतील.
आजपासून शालिनी भालेकर ट्रॉफी
२३ वर्षांखालील मुलांसाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शालिनी भालेकर निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून दादर पारसी ...
Maharashtra Times 9 Oct 2018, 4:00 am