अ‍ॅपशहर

'हा' ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाला 'भारतीय'!

२००७ चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख शिलेदार राहिलेला तेजतर्रार गोलंदाज शॉन टेट आता 'भारतीय नागरिक' बनला आहे. त्यानं आपलं प्रवासी भारतीय नागरिक कार्ड ट्विटरवरून शेअर केलं असून क्रिकेटप्रेमींनी त्यावर 'लाइक्स'चा पाऊस पाडलाय.

Maharashtra Times 26 Mar 2017, 12:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shaun tait turns as indian from australian he showed his overseas citizen passport of india
'हा' ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाला 'भारतीय'!


२००७ चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख शिलेदार राहिलेला तेजतर्रार गोलंदाज शॉन टेट आता 'भारतीय नागरिक' बनला आहे. त्यानं आपलं प्रवासी भारतीय नागरिक कार्ड ट्विटरवरून शेअर केलं असून क्रिकेटप्रेमींनी त्यावर 'लाइक्स'चा पाऊस पाडलाय.

शॉनची पत्नी भारतीय आहे. मुंबईची मॉडेल मशहूम सिंहा हिच्याशी त्यानं २०१४ मध्ये लगीनगाठ बांधली होती. आयपीएल स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्सकडून खेळायचा. त्या दरम्यानच त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या होत्या. त्यामुळेच मुंबईच्या या जावयानं प्रवासी भारतीय नागरिकत्व घेतलं आहे.

pic.twitter.com/lpTPubjXjP — Shaun Tait (@shaun_tait32) March 19, 2017 शॉन टेटच्या ट्विटवर काही भारतीय क्रिकेटप्रेमींनी त्याला 'मेन इन ब्ल्यू' होण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, प्रवासी भारतीय नागरिकत्वाच्या आधारे तो टीम इंडियातून खेळू शकणार नाही. त्यासाठी त्याला २०२० पर्यंत वाट बघावी लागेल. तोपर्यंत तो ३८ वर्षांचा झालेला असेल.

शॉन टेटनं २०११ मध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. २००८ नंतर तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. दुखापतींमुळे त्याची कारकीर्द अस्थिर राहिली. गेल्या वर्षभरात तो टी-२० सामनाही खेळलेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज