अ‍ॅपशहर

संथ हालचालींचा शिखरला फटका : सुनील गावस्कर

भारताचा सलामीवीर शिखर धवनला सध्या धावांसाठी कमालीचा संघर्ष करावा लागतो आहे. सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा हा फलंदाज यंदाच्या आयपीएलमध्येही कमी पडतो आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी मंगळवारी भाष्य केले.

Maharashtra Times 20 Apr 2016, 3:05 am
नवी दिल्लीः भारताचा सलामीवीर शिखर धवनला सध्या धावांसाठी कमालीचा संघर्ष करावा लागतो आहे. सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा हा फलंदाज यंदाच्या आयपीएलमध्येही कमी पडतो आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी मंगळवारी भाष्य केले. त्यांच्या निरीक्षणानुसार फलंदाजीदरम्यान पायांच्या हालचाली (फूटवर्क) संथ होत असल्याने शिखर झटपट बाद होतो आहे. ‘अलीकडील त्याच्या खेळी मी पाहिल्या अन् माझ्या लक्षात आले की फलंदाजी करताना त्याच्या पायाच्या हालचाली खूप संथ होतात. यात सुधारणा करण्यासाठी शिखरने सराव व व्यायामात आणखी मेहनत घेतल्यास फायदा होईल. दोरीवरील उड्या मारणे त्याला फळू शकेल’, असे गावस्कर सूचवतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shikhar dhawan
संथ हालचालींचा शिखरला फटका : सुनील गावस्कर


एका वृत्तवाहिनीवरील आपल्या विश्लेषणात्मक कार्यक्रमात गावस्कर यांनी शिखर धवनबाबत मते मांडली. ‘प्रदीर्घ खेळी करण्याच्या अपेक्षेचे ओझे असल्याने शिखरवर दडपण आले आहे. त्यामुळेच तर गेल्या चार, पाच सामन्यांमध्ये तो झटपट बाद होताना दिसतो आहे. गेल्या काही सामन्यांमधील पराभवांवरुन आपण त्याने याआधी दिलेले योगदान विसरून लगेचच त्याच्यावर टीका करतो. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नऊ शतके केली आहेत हे विसरून चालणार नाही’, अशी आठवणही गावस्कर करून देतात.

गंभीर पुनरागमन करेल

सध्या आयपीएलमध्ये सातत्याने धावा करणारा गौतम गंभीर भारतीय संघात पुनरागमन करू शकेल, असा गावस्कर यांचा अंदाज आहे. गंभीरनेही पदलालित्यावर (फूटवर्क) मेहनत घ्यावी, असे गावस्कर सूचवतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज