अ‍ॅपशहर

शिखर धवनला डच्चू; मयांकला संधी

वेस्ट इंडिजविरुद्ध ४ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर फ्लॉप ठरलेल्या सलामीवीर शिखर धवनला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी उदयोन्मुख फलंदाज मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2018, 10:16 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shikhar-mayank


वेस्ट इंडिजविरुद्ध ४ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर फ्लॉप ठरलेल्या सलामीवीर शिखर धवनला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी उदयोन्मुख फलंदाज मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.

आशिया चषकात विश्रांती घेणाऱ्या विराट कोहलीच्या हाताला दुखापत झाल्याने त्याला विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व विराट करणार असल्याचे निवड समितीने स्पष्ट केल्याने ही शक्यता मावळली आहे.

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली असून इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्या जायबंदी असल्याने दोघांनाही संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

असे होणार सामने

वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात २ कसोटी, ५ वनडे आणि ३ टी-२० सामने होणार आहे. पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान राजकोट येथे तर दुसरा सामना १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान वनडे मालिका रंगणार आहे. ४ नोव्हेंबर (कोलकाता), ६ नोव्हेंबर (लखनऊ) आणि ११ नोव्हेंबर (चेन्नई) रोजी टी-२० सामने होतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज