अ‍ॅपशहर

टी-२०: किवींविरुद्ध टीम इंडियात दोन नवे भिडू

मुंबईचा तरुण-तडफदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा झंझावाती गोलंदाज मोहम्मद सिराज या दोन वीरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला.

Maharashtra Times 23 Oct 2017, 3:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shreyas iyer siraj called up for new zealand t20is
टी-२०: किवींविरुद्ध टीम इंडियात दोन नवे भिडू


मुंबईचा तरुण-तडफदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा झंझावाती गोलंदाज मोहम्मद सिराज या दोन वीरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला. त्यात या दोघांसाठी टीम इंडियाची दारं उघडली आहेत. दुसरीकडे, धडाकेबाज फलंदाज केदार जाधवला या मालिकेतून वगळण्यात आलंय.

१ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामना हा आशीष नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

गेल्या काही महिन्यात भारत-अ संघातून श्रेयस अय्यरने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. द. आफ्रिका अ आणि अफगाणिस्तान अ संघाविरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये त्यानं २१३ धावा केल्यात. न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या मालिकेत त्यानं चार डावात एका शतकासह तीन अर्धशतकं झळकावली होती.

मोहम्मद सिराजनं केलेल्या कामगिरीच्या जोरावर रणजी स्पर्धेत हैदराबादनं बाद फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर, सनरायजर्स हैदराबादनं त्याला २.६ कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं. आयपीएलमधील सहा सामन्यात दहा विकेट घेऊन त्यानं आपली ताकद दाखवून दिली होती.

भारतीय संघ असाः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, एम एस धोनी, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, आशीष नेहरा (फक्त पहिल्या सामन्यासाठी)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज