अ‍ॅपशहर

स्मिथ हा कर्णधार म्हणून अयोग्य!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ हा मानसिकदृष्ट्या अयोग्य आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे ते माजी स्पिनर केरी ओकीफने. अलीकडेच आटोपलेल्या अन् भारताने जिंकलेल्या गावस्कर-बॉर्डर मालिकेदरम्यान स्मिथ नको तेवढा भावूक झाला. ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधाराने मालिका आटोपल्यावरही अतिभावूक होऊन दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल उघड माफी मागितली.

Maharashtra Times 30 Mar 2017, 4:00 am
वृत्तसंस्था, मेलबर्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम smith not temperamentally sound to be australia captain okeeffe
स्मिथ हा कर्णधार म्हणून अयोग्य!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ हा मानसिकदृष्ट्या अयोग्य आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे ते माजी स्पिनर केरी ओकीफने. अलीकडेच आटोपलेल्या अन् भारताने जिंकलेल्या गावस्कर-बॉर्डर मालिकेदरम्यान स्मिथ नको तेवढा भावूक झाला. ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधाराने मालिका आटोपल्यावरही अतिभावूक होऊन दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल उघड माफी मागितली.

‘स्मिथ हा प्रामाणिक आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणे म्हणजे जिकरीचे काम आहे. दडपणाचे ओझे घेऊन मैदानात लढावे लागते. जे स्मिथच्या आवाक्या बाहेरचे वाटू लागले आहे. तो पुढाकार घेऊन लढतो खरा; पण त्याच्यामध्ये नेतृत्व गुण कमीच आहेत’, ओकीफ यांनी ऑस्ट्रेलियातीलच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हे विचार मांडले.

‘स्मिथ मानसिकदृष्ट्या कमी पडतो आहे, असे मला वाटते त्यामागेही तसे कारण आहे. तो बऱ्याचदा खूप भावूक होतो. मुरली विजयच्या झेलनंतर त्याने केलेला गाजावाजा तर अजबच होता. तो झेल सफाईदार नव्हता हे मान्य; पण एखाद्याला थेट फसव्या म्हणणे योग्य नाही. असे मागाचा पुढचा विचार न करता व्यक्त होणे चुकीचे आहे’, असे ओकीफ म्हणाले.

स्मिथ मोठा कर्णधार होईल

धरमशालाः एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या एका माजी खेळाडूकडू स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वार टीका होत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमनने मात्र स्मिथचे कौतुक केले आहे. ब्रॅडमन यांच्यासारखी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा स्मिथ भविष्यात मोठा कर्णधार होईल, असे लेहमनचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज