अ‍ॅपशहर

कोहली ग्लोबल सुपरस्टार: स्टीव्ह वॉची स्तुतिसुमने

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील क्रमांक एकचा फलंदाज आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याच्यापेक्षा कोहली उजवा असल्याचेही वॉने म्हटले आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत १४९ आणि ५१ धावांची खेळी केली होती. यानंतर तो आयसीसीच्या क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. स्टीव्ह स्मिथला मागे सारत कोहलीने हे स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2018, 8:55 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat-kohli

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील क्रमांक एकचा फलंदाज आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याच्यापेक्षा कोहली उजवा असल्याचेही वॉने म्हटले आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत १४९ आणि ५१ धावांची खेळी केली होती. यानंतर तो आयसीसीच्या क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. स्टीव्ह स्मिथला मागे सारत कोहलीने हे स्थान पटकावले आहे.

कोहलीची प्रशंसा करत वॉ पुढे म्हणाला, 'स्टीव्ह स्मिथची धावांची भूक सर्वात जास्त आहे असे मला वाटते, परंतु सध्या तो १२ महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर आहे. अशात कोहली सर्वोत्कृष्ट आहे असे मला वाटते. तो ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विवियन रिचर्ड्स आणि जावेद मियांदादप्रमाणे मोठ्या संधींच्या शोधात असतो.'

एका खासगी मुलाखतीत कोहलीची प्रशंसा करताना वॉ म्हणाला, 'कोहलीकडे उत्कृष्ट तंत्र आहे. तसे तंत्र जगातील कोणत्याही विद्यमान फलंदाजाकडे नाही. एबी डिव्हिलियर्स देखील असाच आहे, परंतु त्याने कसोटी क्रिकेट सोडले आहे. हे पाहता विराट सर्वांच्या पुढे निघून जातो.'

यापूर्वी देखील वॉने कोहलीची प्रशंसा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान विराटची शानदार फलंदाजी पाहिल्यानंतर प्रशंसा करताना वॉने लिहिले, 'कोहली हा ग्लोबल सुपरस्टार आहे आणि तो जागतिक क्रिकेटमधील सर्व रेकॉर्ड तोडणार आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज