अ‍ॅपशहर

भारताच्या युवा संघाचा विजय

भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या युवा संघावर १६९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Maharashtra Times 13 Aug 2017, 4:00 am
ब्रिजटोन : भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या युवा संघावर १६९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ७ बाद ३२७ धावा केल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम super shubhman guides india colts to series win vs england
भारताच्या युवा संघाचा विजय


शुभमन गिलने १२७ चेंडूंत १४७ धावा ठोकत भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा संघ ४०.५ षटकांत १५८ धावांतच बाद झाला. भारताकडून कमलेश नागरकोटीने २० धावांत ३ बळी घेतले. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. संक्षिप्त धावफलक : भारत - ५० षटकांत ७ बाद ३२७ (शुभमन गिल १४७, हेत पटेल ३८, मॅथ्यु पॉट्स ६१-४) वि. वि. इंग्लंड - ४०.५ षटकांत १५८ धावा (टॉम बँटॉन ५९, थॉमस लॅमोनबॉय २४, कमलेश नागरकोटीने २०-३, शुभमन गिल ९-२) सामनावीर- शुभमन गिल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज