अ‍ॅपशहर

रैनानं टी-२०मध्ये कोहलीला मागे टाकलं!

टीम इंडियाचा शिलेदार आणि आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैना टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यात रैनानं ४६ चेंडूत ८४ धावांची तडाखेबंद खेळी करून विराट कोहलीचा मागे टाकलं.

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suresh raina surpasses virat kohli in t20 format and ipl runs
रैनानं टी-२०मध्ये कोहलीला मागे टाकलं!


टीम इंडियाचा शिलेदार आणि आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैना टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यात रैनानं ४६ चेंडूत ८४ धावांची तडाखेबंद खेळी करून गुजरातचा विजय साकारला आणि धावांच्या शर्यतीत विराट कोहलीलाही मागे टाकलं.

टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या खात्यात ६६६७ धावा जमा आहेत. त्याला कोण मागे टाकणार, याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मधल्या फळीत येऊन स्वच्छंद फटकेबाजी करणारा सुरेश रैना ही किमया करू शकतो, असं अनेकांना वाटत होतं. हा अंदाज अखेर रैनानं खरा ठरवला. कालच्या सामन्यानंतर रैना कोहलीच्या पुढे गेला असून आता टी-२० मध्ये त्याच्या खात्यावर ६६७३ धावा जमा आहेत.

आयपीएलमध्ये कोहली आणि रैना यांच्यात अटीतटीची झुंज असते. कधी रैना पुढे, तर कधी कोहली, अशी चुरस तिथे पाहायला मिळते. रैनानं आयपीएलमधील १४७ इनिंग्जमध्ये ४३४१ धावा केल्यात, तर विराटच्या बॅटमधून १३३ इनिंग्जमध्ये ४२६४ धावांचा पाऊस पडलाय. आता त्यांच्यातील ही स्पर्धा अधिकाधिक रंगतदार होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज