अ‍ॅपशहर

स्वप्निल चव्हाण २००

अल बरकतच्या स्वप्नील चव्हाणने केलेल्या २०० धावांच्या खेळीमुळे त्यांनी शारदाश्रम विद्यामंदिर, इंग्लिश शाळेवर एक डाव आणि ८९ धावांनी विजय मिळविला.

Maharashtra Times 8 Dec 2016, 5:46 am
मुंबई : अल बरकतच्या स्वप्नील चव्हाणने केलेल्या २०० धावांच्या खेळीमुळे त्यांनी हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम विद्यामंदिर, इंग्लिश शाळेवर एक डाव आणि ८९ धावांनी विजय मिळविला. नौफिल रोझानी (५-५८) आणि नबीजान अन्सारी (४-२८) यांच्यामुळे शारदाश्रमचा दुसरा डाव ८२ धावांत आटोपला. बालमोहन विद्यामंदिरच्या श्रेयस फाटकने काल १६२ धावांची खेळी केली होती. आज अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करताना त्याने दोन्ही डावात मिळून १० बळीही घेतले. जमनाबाई नरसी शाळेला पहिल्या डावात त्याने ५-५२ या कामगिरीच्या आधारावर १६७ धावांत गुंडाळले तर फॉलोऑननंतर जमनाबाईचा दुसरा डाव १२६ धावांत आटोपला तेव्हा श्रेयसने ५-५५ अशी कामगिरी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swapnil chavan 200 in haris shield
स्वप्निल चव्हाण २००


त्यात अथर्व चव्हाणच्या ४ बळींचा समावेश होता. या कामगिरीमुळे बालमोहनने एक डाव १६ धावांनी विजय मिळविला. स्वामी विवेकानंदच्या यश जठारने घेतलेल्या ५ बळींमुळे कॅथेड्रल अँड जॉन कॉननवर एक डाव १२३ धावांनी विजय मिळविता आला. त्यात सुवेद पारकरच्या शतकी खेळीचा व ४ बळींचाही मोठा वाटा होता. आणखी एका लढतीत अथर्व बापेरकरने दोन्ही डावात मिळून (५-४७ आणि ४-६८) ९ बळी घेत डॉन बॉस्कोला व्हीपीएमएस विद्यामंदिरविरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवून दिला.

अंजुमन इस्लाम अल्लानाने लिलावती पोदारला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर नमवले खरे पण लिलावतीच्या अब्बास कराचीवालाने ७ बळी घेत चमक दाखविली. बांद्रा येथील न्यू इंग्लिश स्कूलला स्वामी विवेकानंद, कांदिवली शाळेकडून पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर हार सहन करावी लागली. त्यात विवेकानंदच्या साई नायडूने पुन्हा एकदा शतकी खेळी केली. त्याने १०६ धावा केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज