अ‍ॅपशहर

सामना भारत आणि द. आफ्रिकेचा पण पाकिस्तान होऊ शकतो वर्ल्डकपमधून बाहेर, जाणून घ्या कसं...

IND vs SA : रविवारी भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. पण हा सामना या दोन्ही संघांपेक्षा पाकिस्तानसाठी महत्वाचा असेल. कारण या एका सामन्यावर त्यांचे या विश्वचषकातील भवितव्य अवलंबून असेल. या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमधून नेमका बाहेर कसा पडू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 Oct 2022, 7:17 pm
पर्थ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रविवारी सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेलच, पण त्यापेक्षा हा सामना पाकिस्तानसाठी महत्वाचा ठरणार आहे. हा सामना जरी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा असला तरी पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचचषकातून बाहेर पडू शकतो, असे समीकरण आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs SA
सौजन्य-ट्विटर


जाणून घ्या कसं असेल विश्वचषकाच्या सेमी फायनलचं समीकरण...
हे तिन्ही संघ विश्वचषकातील दुसऱ्या गटात आहेत. या गटात भारतीय संघ दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पण पाकिस्तानचा संघ हा या गटात पाचव्या स्थानावर आहे, कारण त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळेच त्यांनी गुणांचे खाते अजून उघडलेले नाही. जर हा सामना भारताने जिंकला तर ते अव्वल स्थानावर कायम राहतील, पण जर हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर ते पाच गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचू शकतात.

भारताला जर या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर पाकिस्तानचे विश्वचषकातील गणित फिस्कटू शकते. कारण भारताच्या सामन्यांवर पाकिस्तानचे या विश्वचषकातील आव्हान टिकून आहे. जर हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर त्यांचे पाच गुण होतील आणि जर त्यांनी अजून एक सामना जिंकला तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतील. जर दक्षिण आफ्रिकेने जर दोन सामने जिंकले तर त्यांचे सात गुण होतील. पाकिस्तानचे आता तीन सामने शिल्लक आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये जरी त्यांनी विजय मिळवला तरी त्यांचे सहा गुण होतील आणि ते विश्वचषकातून बाहेर पडतील. या सामन्यातील जय-पराजयाबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची ठरू शकते.

या सामन्यात जर पाऊस पडला आणि सामना जर रद्द करावा लागला तर दक्षिण आफ्रिकेचा संघ चार गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर राहतील आणि त्यानंतर अजून एका विजयासह ते विश्वचषकातील आपली दावेदारी सिद्ध करू शकतील. कारण जर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान सहा गुण झाले तरी सध्याच्या घडीला रनरेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानपेक्षा सरस आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रननेट हा ५.२०० एवढा तगडा आहे, एवढा रनरेट तर भारताचाही अजून नाही. दुसरीकडे पाकिस्तानचा रनरेट हा -०.०५० एवढा आहे. त्यामुळे रनरेट कमी असल्यामुळे गुण समान असूनही ते विश्वचषकात्या बाहेर पडू शकतात. त्यामुळे जर दक्षिण आफ्रिका या सामन्यात पराभूत झाली तरच पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान कायम असण्याची शक्यता जास्त असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख