अ‍ॅपशहर

पराभवानंतर पाकिस्तानला बसला अजून एक मोठा धक्का, शाहिन आफ्रिदीबाबत आली वाईट बातमी

T 20 World Cup 2022 Final : पाकिस्तानला यापुढे न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या देशांबरोबर दोन हात करायचे आहेत. या दोन देशांबरोबर त्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत. पण या मालिकेत आता एक मॅचविनर खेळाडू त्यांच्या संघात नसू शकतो, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता कोणता मॅचविनर खेळाडू संघाबाहेर गेला आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 14 Nov 2022, 8:41 pm
नवी दिल्ली : पाकिस्तानला T20WorldCup2022final गमवावी लागली. पण आता टी-२० विश्चषकातील फायनलमध्ये पराभूत झाल्यावरही पाकिस्तानच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण आता अजून एक वाईट बातमी त्यांच्यासाठी आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 World Cup 2022 Final
सौजन्य-ट्विटर


पाकिस्तानने विश्वचषक गमवला. पण आता त्यांना यापुढे न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या देशांबरोबर दोन हात करायचे आहेत. या दोन देशांबरोबर त्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत. पण या मालिकेत आता एक मॅचविनर खेळाडू त्यांच्या संघात नसू शकतो, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानला ज्याच्यामुळे विश्वचषक गमवावा लागला, असे शाहिन आफ्रिदीबरोबर चाहते बोलत आहेत. कारण आफ्रिदी मोक्याच्या क्षणी मैदानाबाहेर गेला आणि तिथेच सामना फिरल्याचे म्हटले जात आहे. आता पाकिस्तानसाठी अजून एक वाईट बातमी आली आहे. कारण आफ्रिदीची ही दुखापत चांगलीच बळावली आहे. त्यामुळे आता त्याला आगामी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. कारण आता आफ्रिदीच्या दुखापतींवर उपचार केले जाणार आहेत आणि यामधून बाहेर पडायला त्याला २-३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे म्हटले जात आहे. यापूर्वी आशिया चषकाच्यावेळीही त्याला दुखापत झाली होती. यामधून तो बाहेर पडत फिट झाला होता. पण फायनलमध्ये त्याने एक कॅच पकडली आणि त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते आणि त्यानंतर सामना इंग्लंडच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले होते.

आफ्रिदीची ही दुखापत फारच गंभीर होता आणि मैदानात लवकर जाण्याच्या नादात आफ्रिदीने यावेळी दुखापतीवर योग्य उपचार घेतले नाहीत. त्यामुळे जेव्हा तो मैदानात आला तेव्हा त्याचा गुडघा पुन्हा एकदा दुखत असल्याचे जाणवत होते. त्यामध्येच बाबर आझमने त्याला गोलंदाजीला आणले. आफ्रिदी यावेळी १६ वे षटक टाकण्यासाठी आला. पण आफ्रिदीने यावेळी १६व्या षटकाचा पहिला चेंडू टाकला. पण हा चेंडू टाकल्यावर त्याचा गुडघा पुन्हा एकदा दुखावल्याचे पाहायला मिळाले. त्याची ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर आफ्रिदी पुन्हा एकदा कधी मैदानात येणार यांची उत्सुकता सर्वांनाच होती. पण त्यानंतर मात्र आफ्रिदी हा मैदानात उतरलाच नाही. कारण तो चुकीच्यावेळी मैदानात आला होता. जर त्याने योग्य उपचार घेऊन थोडी वाट पाहिली असती आणि थोडे व्यायाम प्रकार केले असते, तर ही गोष्ट पाहायला मिळाली नसती. त्यामुळे ही चूक पाकिस्तानला चांगलीच भोवली होती.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख