अ‍ॅपशहर

सेमीफायनलपेक्षा तिच्या सौंदर्याचीच अधिक चर्चा, व्हायरल पाकिस्तानी 'मिस्ट्री गर्ल' सापडली...

Pakistan Mistry Girl: टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान चिअर करणारी तरुणी कोण होती, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. ही तरुणी कधी फ्लाइंग किस देताना दिसली तर कधी हात उंचावून पाकिस्तानी टीमला प्रोत्साहन देताना दिसली.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2022, 8:12 pm
मुंबई: पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात पाकिस्तान न्यूझीलंडला पराभूत करुन थेट फायनलमध्ये पोहोचला आहे. यावेळी मैदानात खेळाडूंचा उत्साह तर शिगेला पोहोचलेला होताच, पण पव्हेलियनमधील प्रेक्षकांचाही उत्साह पाहाण्यासारखा होता. अशाच एका पाकिस्तानी महिला चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pakistani Girl Goes Viral
पाकिस्तान वर्ल्ड कप फायनलमध्ये, पण सोशल मीडियावर चर्चा या तरुणीची..




टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिअर करणारी तरुणी कोण होती, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. ही तरुणी कधी फ्लाइंग किस देताना दिसली तर कधी हात उंचावून पाकिस्तानी टीमला प्रोत्साहन देताना दिसली. कॅमेरामनही वारंवार त्या तरुणीवर फोकस करत होता. त्यामुळे पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचल्यापेक्षा या तरुणीचीच चर्चा जास्त होत आहे.

हेही वाचा - Video: एकटा बसला आणि भावना मोकळ्या केल्या; नशिबाने पुन्हा एकदा रोहितची साथ सोडली...



रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या या 'जबरा फॅन'चे नाव नताशा आहे. ती मूळची पाकिस्तानी आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आणि तिथेच ती मोठी झाली. नताशा सध्या मेलबर्नमध्ये राहते. तिच्या इंस्टाग्राम बायोवर तिने स्वतःला ऑस्ट्रेलियन पंजाबन लिहिलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामन्यानंतर व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर, विशेषतः इन्स्टाग्रामवर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. व्हायरल होण्यापूर्वी तिचे जवळपास १,५०० फॉलोअर्स होते, जे आता ३५ हजारांहून अधिक झाले आहेत. मात्र, आता तिने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले आहे.

हेही वाचा -India Vs England: रोहित-राहुलची जोडी फ्लॉप, कुठे चुकली टीम इंडिया, पराभवाची ५ मोठी कारणं



व्हायरल झाल्यानंतर त्याच्या नावाने अनेक बनावट खाती तयार करून पोस्ट करण्यात आली. ज्यासाठी तिने आपल्या फॉलोअर्सना त्या खात्यांची तक्रार करण्यास सांगितले आहे. नताशाच्या नावाने काही बनावट ट्विटर अकाऊंटने काही तासांत हजारो फॉलोअर्स मिळवले आहेत. यामुळे व्यथित झालेल्या नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये तिने तिचा खरा आयडी उघड केला.

लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख